गुरुवार, १७ नोव्हेंबर, २०१६

माझ्यात लहान मूल दडलेलं वगैरे नाही ... मीच लहान आहे ...

शाळेत , हायस्कुलात , कॉलेजात , नोकरीत आणि आत्ताही मी गोट्या ( आत्ता म्हातारपणाकडे झुकलेल्या लोकांना प्रचंड आवडतो हा खेळ , जुन्या आठवणी निघतात ... ) गोट्यांच्या खेळावर वेगळं लिहीणार आहे ... ) , चिनी - दांडू , सळीमार , चिंचोके , दगडगोट , कपरी याबरोबरच क्रिकेट , बुद्धिबळ , कॕरम , बॕडमिंटन ( स्पर्धेतही खेळलोय कॉलेजात )  , टेबल टेनिस ( लॉला असताना कोल्हापूर हॉस्टेलमध्ये ) , वॉलीबॉल इ .  हे सर्व खेळ मी आजतागायत खेळलोय , काही कधी कधी अजूनही खेळतोय ! ज्यांच्यासोबत खेळतोय ते ही माझ्या वयाच्या आसपास कमी अधिक असतात ! इतकी मज्जा आजही येते म्हणून सांगू ...  ! यावर्षी गणपतीच्या दिवसांत गावाकडं गेलो होतो तेव्हा पुन्हा डाव मांडण्याचा योग आला ... आज बालदिन म्हणून हे सांगतोय ...

सगळ्या लहानांचा हरेक दिवस आनंदात , प्रेमात  आणि वात्सल्याच्या छायेत जावावा !!!

 ( viewers discrimination : ---> मला मोठ्ठा बिठ्ठा समाजसेवक मानणाऱ्यांनी जाणावं की माझ्या ह्या लहान बुद्धिमत्तेमुळेच मी कुठल्याही मनोरुग्णाला मिठी मारू शकतो  ..  :-P  ! लहान मुलं " कुछ तो लोग कहेंगे " च्या पल्याड जगतात ... मी ही ! :-D  )